शैक्षणिक
प्रकल्प
इयत्ता
पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी –
भाषा
* परिसरातील
प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे
जमविणे. * बडबडगीते
तोंडपाठ करणे. * चित्रे
दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी
परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस
, सहल
प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने
इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी
चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक
खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर
व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट
घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार
, सरपंच
, ग्रामसेवक
, तलाठी
,शिक्षिका
. * देशभक्तीपर
गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध
पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे . * पाऊस
विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे. * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे. * पाळीव
प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. * तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती
मिळवा. * आपल्या
गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा. * वेगवेगळ्या
पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
गणित
नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे. * पुठ्याचे
विविध आकार तयार करणे .अर्धा ,
पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे . * आलेख
कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे . * विविध
भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
सामान्य विज्ञान
-: * परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे
-चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव. * आपले
शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग . * चांगल्या सवयींची यादी -अंगीकार * पाण्यात
विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी. * प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग (
चित्रासह ) * ज्ञानेंद्रिये
- चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य . * बियांचा
संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग . * उपयुक्त
प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग . * मातीचे प्रकार व नमुने संग्रह , * घरातील
व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी. * शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी
उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती . * शास्त्रज्ञांची
नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा. * पदार्थाची
स्थायू ,द्रव
,वायू
गटात विभागणी . *
गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा. * पृष्ठवंशीय
व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा. * हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी
माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
इतिहास व ना.शास्त्र
-: * दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे . * ग्रामपंचायतीस
भेट देऊन कारभाराची माहिती घेणे . * संतांची चित्रे व माहिती . * शिवरायांच्या
बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह . * अश्मयुगीन
हत्यारांची यादी करा,चित्रे
मिळवा. * शेतीच्या
आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा. * गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती
संकलित करा. * देशात
बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा. * हक्क
व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. * समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या
कार्याची माहिती संकलित करा.
भूगोल
-: * आपल्या परिसरातील विविध भूरुपांची
माहिती . * ऋतू
,महिने
व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना . * गावातील
पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम. * शेतीस
भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे . * खनिज
व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा. * परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा. * गावच्या
बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा. * विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
No comments:
New comments are not allowed.